सांगवीमध्ये मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

सांगवीमध्ये मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात

 सांगवीमध्ये मद्याची बेकायदेशीर वाहतूक करणारे दोघे पोलिसांच्या ताब्यात 

पिंपरी, ता. १३ - सांगवी पोलिसांनी महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये कारवाई करत बेकायदेशीररीत्या मद्याची वाहतूक करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत सुमारे २६ हजार ५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एक ऑटो रिक्षाही ताब्यात घेण्यात आली आहे. दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ जून २०२६ रोजी सकाळी ११.४५ वाजण्याच्या सुमारास नवी सांगवी येथील समरनाईन हॉटेल परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस हवालदार सचिन धर्माजी ढवळे यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

या प्रकरणात वासुदेव घोडीराम सूर्यवंशी (वय ५६, रा. नवी सांगवी) आणि कृपासिंधू शामसिंग (वय २८, मूळ रा. भद्रक, ओडिशा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींकडून महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (अ), (ई) व ८३ अन्वये कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या तपासात आरोपी हे ऑटो रिक्षामधून बेकायदेशीररीत्या मद्य वाहतूक करून विक्रीसाठी घेऊन जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी छापा टाकून मद्यसाठा जप्त केला.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories