पिंपरी चौकात युवकांकडून दिड लाखांच्या बियरच्या बाटल्या जप्त
पिंपरी, ता. १३ - पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात इराणी कॅफेसमोर दोन युवकांकडून १ लाख ५२ हजार ४४० रुपयांच्या वेगवेगळ्या कंपनीच्या बियरच्या बाटल्या पिंपरी पोलिसांनी शुक्रवारी (ता. १२) जप्त केल्या. दारु विक्रीचा आणि वाहतूकीचा परवाना नसताना हे युवक या दारुच्या बाटल्या विक्रीसाठी नेत होते. या प्रकरणी दोन्ही युवकांवर पिंपरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत, पिंपरी पोलिस ठाण्याचे पोलिस शिपाई समीर लक्ष्मण ढवळे यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी, १) लोकेश बालराज जलनिला (वय-२८ वर्षे, रिक्षाचालक, रा.धोबीघाट दापोडी) व २) हरपाल महेंद्र पाल (वय-२४ वर्ष,मजुरी, रा. दापोडी) हे रिक्षातून १,५२,४४०/-रूपये किंमतीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या बियरच्या बाटल्या वाहतुकीचा व विक्रीचा कोणताही परवाना नसताना बेकायदेशिरपणे वाहतूक करत होते.
आरोपींवर पिंपरी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र प्रोव्हिबिशन अॅक्ट कलम ६५ (ई), ८३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.