जाधववाडी - वर्षभरापूर्वीच्या वादातून १७ वर्षीय मुलावर लोखंडी रॉडने हल्ला

जाधववाडी - वर्षभरापूर्वीच्या वादातून १७ वर्षीय मुलावर लोखंडी रॉडने हल्ला

चिखली | २८ ऑगस्ट २०२६ : सुमारे वर्षभरापूर्वी झालेल्या वादाचा राग मनात धरून तीन जणांनी १७ वर्षीय मुलावर लोखंडी रॉडने हल्ला केला. मुलाच्या मदतीसाठी आलेल्या त्याच्या मित्रालाही आरोपींनी मारहाण केली. ही घटना २६ ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास जाधववाडीतील शालीमार हॉटेलसमोर, सिल्व्हर जिम रोडवर घडली.

याप्रकरणी खुर्शीद समीउल्ला शेख (वय १७) याने चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी समीर खान, अमन खान आणि आतिश या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व आरोपी चिखलीतील रिव्हर रेसिडेन्सी परिसरातील रहिवासी असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खुर्शीद आणि त्याचा मित्र वसीम शेख हे शालीमार हॉटेलसमोर चहा पिऊन घरी जात होते. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या आरोपींनी त्यांना अडवले. आरोपींनी खुर्शीदकडे त्याचा भाऊ फिरोज खान याच्याबाबत विचारणा केली.

सुमारे वर्षभरापूर्वी फिरोज आणि आरोपींमध्ये वाद झाला होता. या जुन्या वादातून आरोपींनी खुर्शीदला शिवीगाळ करत मारहाण केली. आरोपींनी लोखंडी रॉडने खुर्शीदच्या डोक्यावर वार करून त्याला जखमी केले. तसेच वसीमच्या उजव्या मांडीवर रॉडने मारून त्यालाही जखमी केले. आतिश याने हाताने मारहाण आणि शिवीगाळ केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५८९/२०२६ नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शिळीमकर करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories