निराधार अंध मुलींच्या विवाह सोहळ्यात वुई टुगेदर फाउंडेशनची 'आहेर'रुपी मदत
Feb 03 2026
52
निराधार अंध मुलींच्या विवाह सोहळ्यात वुई टुगेदर फाउंडेशनची 'आहेर'रुपी मदत
पिंपरी, ता. ३ - अंध अनाथ मुलामुलींच्या संगोपनासाठी 'माई बालभवन' ही संस्था कार्यरत आहे. संस्थेच्या वतीने नुकताच दोन मुलींचा किवळे येथे विवाह सोहळा आयोजित केला होता. या विवाहासाठी वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे २१ हजार १११ रुपये आहेर देण्यात आला व नवदांपत्यांच्या पुढील जीवनासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या हृद्य क्षणी उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधानाची भावना होती.
माई बालभवन ही संस्था गेली अनेक वर्षे अंध अनाथ मुलामुलींचे संपूर्ण संगोपन करते. या मुलामुलींचे शिक्षण, नोकरी तसेच विवाहाची जबाबदारी संस्था पार पाडते. यंदा नुकताच किवळे येथे संस्थेने दोन मुलींचा विवाह सोहळा आयोजित केला होता. त्यासाठी वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी फाउंडेशनच्या सदस्यांना मदतीचे आवाहन केले. त्यानुसार, फाउंडेशनच्या सर्व सदस्यांनी एकत्र येत या वधू-वरांसाठी २१ हजार १११ रुपयांचा आहेर दिला. या मदतीमुळे या मुलींच्या विवाहसोहळ्याला मोठा हातभार लागला.
वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे, उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे- सपकाळे खजिनदार दिलीप चक्रे, सल्लागार रवींद्र सागडे नंदकुमार वाडेकर, अनिल शिंदे, शंकर कुलकर्णी, अपर्णा कुलकर्णी, राजेंद्र महाले,सरिता कुलकर्णी, विलास कडेकर, दारासिंग मन्हास, सलीम सय्यद ,सीता केंद्रे, सदाशिव गुरव ,दिलीप पेटकर ,के रंगराव, धनराज गवळी ,रमाकांत उजळंबकर, उदय कुलकर्णी, श्रीनिवास जोशी, श्रीरंग दाते, अर्जुन पाटोळे, एम के शेख, अपर्णा अष्टीकर, जावेद शेख, अनिल पोरे, झाकीर सय्यद ,हनीफ सय्यद राजेंद्र ताठे, रवी इंगळे ,दत्तात्रय शेटे,आदींनी या लग्न समारंभासाठी खारीचा वाटा दिला आहे. माई बाल भवनचे संचालक मधुकर इंगळे यांनी वुई टुगेदर फाउंडेशनचे मनापासून आभार मानले.