अल्पवयीन गुन्हेगाराकडून ४० हजार रुपयांजा गांजा जप्त
पिंपरी, ता. २४ - भोसरी येथे अल्पवयीन गुन्हेगाराकडून ४० हजार रुपयांजा गांजा पोलिसांनी गुरुवारी (ता.२३) जप्त केला. रात्री सव्वा नऊच्या सुमारास मच्छीमार्केट परिसरात ही कारवाई करण्यात आली.
याबाबत, पोलिस शिपाई, राहुल बाबाजी डेरे यांनी तक्रार नोंदवली आहे. सदर अल्पवयीने गुन्हेगाराने एकूण ४०,०००/- किंमतीचा ०.८५० किलो ग्रॅम वजनाचा गांजा विक्रीसाठी जवळ बाळगला होता. मच्छी मार्केट परिसरात हा मुलगा पोलिसांनी सापडला. पोलिसांनी त्याच्याजवळचा गांजा जप्त केला आहे.
आरोपी अल्पवयीन गुन्हेगारावर भोसरी पोलिस ठाण्यात शुक्रवारी (ता. २४) एनडीपीएस अॅक्ट कलम ८ (क), २० (ब) (ii) (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.