news
clock
माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत 'गिरिप्रेमी'च्या पथकाने महत्त्वाचा टप्पा केला पूर्ण, ६,११९ मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई

पुणे, ता. २४ -  ज्येष्ठ गिर्यारोहक उमेश झिरपे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित हिमालयातील माऊंट एव्हरेस्ट मोहिमेत आणखी एक महत्त्वाचा टप्पा 'गिरिप्रेमी'च्या पथकाने  यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठल्यानंतर, उंचीशी जुळवून घेण्यासाठी आणि तांत्रिक तयारीसाठी पथकाने Lobuche East या ६,११९ मीटर उंच शिखरावर यशस्वी चढाई केली.

 गिरिप्रेमीच्या पथकातील सदस्य विवेक शिवदे, निकुंज शाह, मिहिर जाधव आणि अखिल काटकर यांनी उर्गेन आणि फुर्बा या अनुभवी शेर्पांच्या सहकार्याने ही चढाई पूर्ण केली. अत्यंत प्रतिकूल हवामान, कमी ऑक्सिजन आणि तांत्रिक स्वरूपाच्या मार्गांवर ही चढाई पार पडली.

लोबुचे ईस्टवरील ही चढाई एव्हरेस्ट मोहिमेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची मानली जाते. यामुळे शरीराची उंचीशी जुळवणूक अधिक सक्षम होते आणि तांत्रिक कौशल्यांची चाचणी घेतली जाते.

 या यशस्वी टप्प्यामुळे गिरिप्रेमीचे पथक पुढील एव्हरेस्ट मोहिमेसाठी अधिक सज्ज झाले आहे.गिरिप्रेमी संस्थेतर्फे सर्व सदस्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले असून, पुढील टप्प्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories