news
clock
विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला दिघीतून अटक

विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला दिघीतून अटक

विनापरवाना पिस्तूल बाळगणाऱ्या युवकाला दिघीतून अटक 

पिंपरी, ता. २२ - एकूण ५१ हजार रुपयांचे देशी बनावटीचे पिस्तूल जिंवत काडतूसासह बाळगणाऱ्या २० वर्षीय युवकाला पोलिसांनी दिघी परिसरातील मॅग्झीन चौकातून अटक केली आहे. आरोपी युवकावर  दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुधीर हरिशचंद्र डोळस यांनी फिर्याद दिली आहे.  आरोपी उमेश उर्फ अजय रेमालीबाई ब्रम्हणे (वय २० वर्षे, रा. शास्त्रीनगर, येरवडा) याने विनापरवानगी देशी बनावटीचे पिस्तूल जिवंत काडतूसासह बाळगले होते. मंगळवारी (ता. २१) रात्री तो पिस्तूलासह मॅग्झिन चौकात सापडला. त्याच्याजवळचे पिस्तूल व काडतूस पोलिसांनी जप्त केले आहे.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाने १३ एप्रिल २०२६ रोजी जारी केलेल्या बंदी आदेशाचे आरोपीने उल्लंघन केले. या आदेशानुसार दगड, शस्त्रे, तलवारी, भाले, लाठी किंवा कोणत्याही प्रकारच्या शारिरीक इजा करणाऱ्या वस्तू बाळगण्यावर बंदी घालण्यात आली होती. 

पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे व त्याच्याविरोधात  भारतीय शस्त्र अधिनियम कलम ३ (२५), महाराश्ट पोलीस अधिनियम कलम ३७, (१), (३) सह १३५ नुसार दिघी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories