आषाढी वारी पालखी सोहळा स्वागत व मुक्कामाच्या ठिकाणांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली पाहणी

आषाढी वारी पालखी सोहळा स्वागत व मुक्कामाच्या ठिकाणांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली पाहणी

आषाढी वारी पालखी सोहळा स्वागत व मुक्कामाच्या ठिकाणांची आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली पाहणी 

पिंपरी, ता. २३ - जुलैमध्ये  संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज आषाढी वारी पालखी सोहळ्याचे आगमन पिंपरी-चिंचवड शहरात होणार आहे. त्या अनुषंगाने पालखी सोहळा स्वागत कक्ष आणि मुक्कामाच्या स्थळांची, तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा मार्ग, विसाव्याचे ठिकाण आणि स्वागत कक्षाच्या ठिकाणांची पाहणी शुक्रवारी (ता. २२) आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी केली. सर्व यंत्रणांनी सुविधांचे नियोजन करावे, सुरक्षिततेच्या दृष्टीने तडजोड न करता पोलिस प्रशासनाशी योग्य समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, असे आदेश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. 

डॉ. सूर्यवंशी म्हणाले, ''वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवा-सुविधांचे नियोजन काटेकोरपणे करावे कोणतीही कमतरता राहणार नाही याची दक्षता घेऊन संबंधित विभागांनी परस्पर समन्वयातून काम करावे. आपत्ती व्यवस्थापनासाठी आवश्यक सर्व यंत्रणा सतर्क व सज्ज ठेवावी शहरातील सर्व होर्डिंग्जची पाहणी करुन धोकादायक अथवा नियमबाह्य होर्डिंग्जवर योग्य कार्यवाही करावी. पालखी मार्ग, मुक्काम स्थळे, विसावा ठिकाणे, पार्किंग परिसरात दिशादर्शक फलक दर्शनी भागात लावावेत. वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावरील महत्त्वाच्या ठिकाणी स्वतंत्र समन्वयकांची नियुक्ती करावी वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था उपलब्ध करून द्यावी वैद्यकीय सुविधांसाठी रुग्णवाहिका, फिरते दवाखाने तसेच २४ तास मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करुन द्यावी. पालखी मुक्काम स्थळे, वारकरी निवास तसेच पालखी मार्गावर पुरेशा प्रमाणात फिरत्या शौचालयांची व्यवस्था करावी, पालखी मार्गावरील खड्डे बुजवून रस्ते सुरक्षित व सुस्थितीत ठेवावेत, प्रत्येक मुक्काम स्थळी स्वतंत्र नियंत्रण कक्ष उभारावा वारकऱ्यांच्या मुक्काम, विसावा आणि कार्यक्रम स्थळांवर स्वच्छता, साफसफाई आणि जंतुनाशक फवारणी नियमित करावी. पालखी मार्ग, स्वागत कक्ष, मुक्काम आणि विसावा स्थळांवरील सीसीटीव्ही कॅमेरे सुरु असतील याची खबरदारी घ्यावी. ''



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories