बारावीच्या परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून मिळणार

बारावीच्या परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून मिळणार

 बारावीच्या परीक्षेचे गुणपत्रक व प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना सोमवारी दुपारी ३ वाजल्यापासून मिळणार 

पुणे, ता. २३ -  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचे एकत्रित गुणपत्रक आणि प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना येत्या सोमवारी (ता. २५) देण्यात येणार आहे.  उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये  दुपारी तीन वाजल्यापासून  गुणपत्रक व प्रमाणपत्राचे विद्यार्थ्यांना वाटप केले जाईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी दिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर २ मे रोजी ऑनलाइनद्वारे जाहीर करण्यात आला.

त्यातील परीक्षेचे गुणपत्रक, प्रमाणपत्र, स्थलांतर प्रमाणपत्र आणि तपशिलवार गुण दर्शविणारे शालेय अभिलेख यांचे वाटप संबंधित विभागीय मंडळांमार्फत सर्व मान्यताप्राप्त उच्च माध्यमिक शाळांना, कनिष्ठ महाविद्यालयांना सोमवारी (ता. २५) सकाळी अकरा वाजता वितरित करण्यात येणार आहे. त्याच दिवशी दुपारी तीन वाजता विद्यार्थ्यांना हे एकत्रित गुणपत्रक प्रमाणपत्र वाटप करण्यात येईल. याबाबत विभागीय मंडळामार्फत सर्व शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांना सूचित केले आहे. 






Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories