अधिक मासानिमित्त एसटीकडून भाविकांसाठी 'गणपतीपुळे', 'तुळजापूर-गाणगापूर' धार्मिक पर्यटनाचे नियोजन
अधिक मासानिमित्त एसटीकडून भाविकांसाठी 'गणपतीपुळे', 'तुळजापूर-गाणगापूर' धार्मिक पर्यटनाचे नियोजन
पुणे, ता. २५ - अधिक मासानिमित्त महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) पुणे विभागीय कार्यालयाकडून भाविकांसाठी विशेष धार्मिक पर्यटनाचे नियोजन केले आहे. पुणे विभागांतर्गत येणाऱ्या शिवाजीनगर आगारातून या गाड्या 'गणपतीपुळे' तसेच 'तुळजापूर-गाणगापूर' याठिकाणी जाणार आहेत.
अधिक मासामध्ये अनेक लोक देवदर्शनसाठी जात असतात. हे लक्षात घेऊन एसटी पुणे विभागाने या विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. दिनांक २ जून २०२६ रोजी गणपतीपुळे दर्शन व दिनांक ४ जून २०२६ रोजी तुळजापूर, गाणगापूर दर्शन असे नियोजन आहे. गणपती पुळे दर्शनासाठी १७६५/- रुपये व तुळजापूर, गाणगापूर दर्शनासाठी १६३८/- रुपये खर्च येणार आहे.
या धार्मिक पर्यटनासाठी आगाऊ आरक्षण शिवाजीनगर बसस्थानक येथे तसेच msrtc मोबाईल अॅप तसेच www.npublic.msrtcors. com या संकेतस्थळावर सुरु झाले आहे. तरी प्रवाशांनी सुरक्षित सेवेचा लाभ घेऊन एस. टी. ने प्रवास करावा व खाजगी वाहतूकीचा प्रवास टाळावा असे, आवाहन पुणे विभागाचे विभाग नियंत्रक अ. भ. सिया यांनी केले आहे.