किरकोळ कारणावरुन तरुणाला धक्काबुक्की, डोकेही फोडले, गांधीनगरमधील घटना

किरकोळ कारणावरुन तरुणाला धक्काबुक्की, डोकेही फोडले, गांधीनगरमधील घटना

किरकोळ कारणावरुन तरुणाला धक्काबुक्की, डोकेही फोडले, गांधीनगरमधील घटना

पिंपरी, ता. २५ - किरकोळ कोणत्यातरी कारणावरुन तीन तरुणांनी एका कोणत्यातरी हत्याराने मारुन जखमी केले. ही घटना शुक्रवारी (ता. २२) सायंकाळी ५ च्या सुमारास गांधीनगर-पिंपरी येथे घडली. युवकाला जखमी करणाऱ्या आरोपींवर रविवारी (ता. २४) संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिलिंद शाहूराव चाबुकस्वार (वय-२८ वर्षे, नोकरी, रा. गांधीनगर, बौध्द विहार जवळ, पिंपरी) याने तक्रार दिली आहे. आरोपी सौदागर हरिदास शिंदे (वय २० वर्षे, रा. गांधीनगर, पिंपरी), राजेंद्र विटकर (रा. वडारगल्ली खराळवाडी, पिंपरी) व शिवडया (पुर्ण नाव माहित नाही. रा. तेलगू गल्ली खराळवाडी, पिंपरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप अटक नाही

शुक्रवारी (ता. २२)  फिर्यादी मिलिंद पायी कामावर जात होता. तेव्हा तिन्ही आरोपींपैकी  एकाने मिलिंदला विचारले की, ''तू इथल्या पोरांसोबत राहतो काय'', त्यावर, मिलिंदने नाही असे उत्तर दिले. तेव्हा त्यांनी मिलिंदला बडबड केली व एकाने मिलिंदची कॉलर पकडून ओढले व दोघांनी मिळून त्याला तेथे उभ्या असलेल्या अॅक्टीव्हा गाडीवर पाडले तेव्हा त्यातील तिस-याने त्याच्या जवळील कोणतीतरी वस्तू काढून मिलिंदच्या डोक्यात मारली व तो जखमी झाला. ते पाहून आरोपी तेथून पळून गेले. 

पोलिसांनी आरोपींनी अद्याप अटक केली नाही. आरोपींवर संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ११८ (१), ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories