बांधकाम व्यावसायिकाला लाखांचा गंडा ; अज्ञातव्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

बांधकाम व्यावसायिकाला लाखांचा गंडा ; अज्ञातव्यक्तीविरोधात गुन्हा दाखल

पिंपरी-चिंचवड : ऑनलाइन मागविलेल्या मोबाईलच्या डिलिव्हरीसंदर्भात संपर्क साधून एका बांधकाम व्यावसायिकाची लाखोंची फसवणूक करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी निगडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, एका अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शुक्रवारी (२० नोव्हेंबर) आकुर्डीतील म्हाळसाकांत चौक परिसरात ही घटना घडली. ओमेश उद्धवराव बिराजदार (वय 32, रा. रावेत) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांनी फ्लिपकार्टवरून मोबाईल मागविला होता. एका अनोळखी व्यक्तीने गुगल मीटवर व्हॉइस कॉल करून मोबाईल डिलिव्हरीसंदर्भात त्यांच्याशी संपर्क साधला.

मोबाईलच्या डिलिव्हरीला उशीर झाल्याने त्याचा मोबदला देण्याचे आमिष दाखवून संबंधित व्यक्तीने तक्रारदार ओमेश बिराजदार यांच्याकडून कार्डसंदर्भातील माहिती घेतली. त्यानंतर त्यांच्या आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डमधून 2 लाख 18 हजार 999 रुपये, तर डेबिट कार्डमधून 3 हजार 256 रुपये त्यांच्या संमतीशिवाय काढून घेण्यात आले.

अशा प्रकारे ओमेश बिराजदार यांची तब्बल 2 लाख 22 हजार 255 रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली.

याप्रकरणी निगडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 318(4) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66 डी नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक जाधव पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories