पहाटेच्या सुमारास दापोडीत थरार! जुन्या वादातून तरुणाला मारहाण

पहाटेच्या सुमारास दापोडीत थरार! जुन्या वादातून तरुणाला मारहाण

पिंपरी-चिंचवड : जुन्या भांडणाचा राग मनात धरून एका 21 वर्षीय तरुणाला शिवीगाळ आणि मारहाण करत त्याच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारण्यात आला. 23 नोव्हेंबरच्या पहाटे 2 च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी दापोडी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दापोडीतील गुलाब काटे चाळ परिसरात तक्रारदार प्रथमेश ऊर्फ गणेश शंकर चलवारे (वय २१ रा. दापोडी) याला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली.  रविवारी (23 नोव्हेंबर) च्या पहाटे प्रथमेश आपल्या घरी आला होता. यावेळी आरोपी प्रतिक धोंडिबा भालेराव (वय २२, रा. दापोडी) त्याच्या घराजवळ आला. 

यापूर्वी प्रथमेशसोबत झालेल्या भांडणाचा राग प्रतिकच्या ंमनात होता. या रागातून त्याने प्रथमेशला शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. त्यानंतर हाताने मारहाण करून तेथे पडलेला सिमेंटचा गट्टू  उचलून यांच्या डोक्यात मारला. या मारहाणीत प्रथमेश जखमी झाला.

या प्रकरणी दापोडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 118(1), 115(2) आणि 352 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस हवालदार गारडे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories