मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेकडून अभिवादन!

मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेकडून अभिवादन!

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर दिवंगत मधुकर पवळे यांच्या पुण्यतिथीनिमित्त महापालिकेच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले. उपमहापौर शर्मिला बाबर यांच्यासह महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या स्मृतींना उजाळा दिला.

पिंपरी येथील महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीमधील मधुकर पवळे यांच्या प्रतिमेस उपमहापौर शर्मिला बाबर यांनी पुष्पहार अर्पण केला. तसेच निगडी येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.

यावेळी उपायुक्त अण्णा बोदडे, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, माजी नगरसदस्या सुमन पवळे, सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र चौधरी, प्रदीप पाटील, दादा पगार, रामाशंकर प्रसाद, राजाराम राऊत, भिकाजी केंजळे, संतोष कवडे, अनिता लांडे, विजय गांगुर्डे, सतीश झेंडे, बाळा मोरे, दीपक पवार, ओंकार पवळे, विनित गवारे, मेजर माने, संदीप कवडे यांच्यासह महापालिकेच्या विविध विभागांतील कर्मचारी उपस्थित होते.

उपस्थितांनी दिवंगत मधुकर पवळे यांना पुण्यतिथीनिमित्त आदरपूर्वक अभिवादन केले.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories