पाईट-धामणे रस्त्यावर भीषण अपघात ; हायवाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पाईट-धामणे रस्त्यावर भीषण अपघात ; हायवाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी-चिंचवड : सोमवारी (23 नोव्हेंबर) खेड तालुक्यातील पाईट-धामणे रस्त्यावरील कात्रज दूध शीतकरण केंद्रासमोर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी हायवा ट्रक चालकाविरोधात उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याक आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोपट अनंता रौंधळ (राहणार पाईट) असे मृत दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी रोहिदास महादेव गडदे (वय 56, रा. शिवे) यांनी उत्तर म्हाळुंगे पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, पोपट रौंधळ हे दुचाकीवरून पाईट-धामणे रस्त्याने जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून हायवा ट्रक येत होता. ट्रकचालक वाहतुकीचे नियम आणि रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगाने वाहन चालवत होते.

हायवा ट्रक चालकाने दुचाकीला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात हायवा ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत दुचाकीस्वार पोपट रौंधळ गंभीर जखमी झाले. या अपघातात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर हायवा ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे.

प्रवीण श्रीधर चौधरी (वय 36, रा. खरपुडी बुद्रुक) असे हायवा ट्रकचालकाचे नाव असूव त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उत्तर म्हाळुंगे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता 2023 कलम 105, 281, 125(अ), 125(ब) आणि मोटार वाहन अधिनियम कायदा 1988 कलम 184, 134 (अ), 134(ब) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक जवळे पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories