पवना धरण ९२.०१ टक्के भरले, आवश्यकतेनुसार पाण्याचा विसर्ग केला जाणार
पिंपरी, दि. २३ जुलै २०२६ - पवना धरण गुरुवारी (ता. २३) ९२.०१ टक्के भरले आहे. काल बुधवारी (ता. २२) धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर पोचला होता. पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे धरणातून आवश्यकतेनुसार कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग करण्यात येऊ शकतो.
त्यामुळे, आवश्यकतेनुसार कोणत्याही क्षणी पाण्याचा विसर्ग होऊ शकतो. नदीकाठावरील नागरिकांनी सतर्क राहून नदीपात्रातील साहित्य, शेती अवजारे, कृषी पंप व जनावरे सुरक्षित ठिकाणी हलवावीत. अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

- नदीकाठ नागरिक, River Side Residents, सतर्कतेचा इशारा, Alert Warning, पूरस्थिती, Flood Situation, पूर नियंत्रण, Flood Control, प्रशासनाचे आवाहन, Administration Appeal
- पाणलोट क्षेत्र, Catchment Area, धरणातून विसर्ग, Dam Water Discharge, पाण्याचा विसर्ग, Water Release
- Pimpri Chinchwad, पुणे, Pune, पावसाळा, Monsoon, मुसळधार पाऊस, Heavy Rainfall
- पवना धरण पाणीसाठा, Pavana Dam Water Level, ९२ टक्के पाणीसाठा, 92 Percent Water Storage