तडीपार व शस्त्रबंदी आदेशाचा भंग करुन कोयता बाळगणारा युवक अटकेत
पिंपरी, ता. २४ - तडीपार आदेशाचे उल्लंघन करुन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्दीत कोयता घेऊन फिरणाऱ्या २८ वर्षीय गुन्हेगाराला निगडी पोलिसांनी अटक गुरुवारी (ता. २३) केली आहे.
पोलिस शिपाई विकास रेड्डी यांनी फिर्याद नोंदवली आहे. आयुब चमन खान (वय-२८ वर्षे, रा. संग्रामनगर झोपडपट्टी, अंकुश चौक, निगडी) याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी आयुबला महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चेकलम ५६ (१) (ब) नुसार दिनांक २८/११/२०२५ रोजीच्या आदेशान्वये पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय हद्द, पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद व पुणे ग्रामीण पोलीस हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार केले आहे. मात्र, त्याने या आदेशाचा तसेच शस्त्रबंदी आदेशाचाही भंग करुन ट्रान्सपोर्ट नगर, निगडी येथे लोखंडी कोयत्यासह तो आढळला. पोलिसांनी कोयता जप्त करुन त्याला ताब्यात घेतले.
आरोपीवर गुरुवारी (ता. २३) निगडी पोलिस ठाण्यात भारतीय हत्यार अधिनियम कलम-४ (२५), महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५,१४२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-