वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर गुन्हा
पिंपरी, ता. २४ - आळंदी-दिघी रस्त्यावर वेश्याव्यवसायाच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी गैरवर्तन करणाऱ्या महिलेवर पोलिसांनी गुरुवारी (ता. २३) गुन्हा दाखल केला आहे.
अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे हवालदार उदयकुमार बाळासाहेब भोसले यांनी तक्रार नोंदवली आहे. सदर महिला आळंदी-दिघी रस्त्याच्या कडेला पदपथावर
वेश्याव्यवसाय करण्याचे उद्देशाने शब्द उच्चारुन, डोळयाने खुणवुन, हाताने लैंगिक हावभाव करुन सार्वजनिक ठिकाणी येणाऱ्या-जाणाऱ्या लोकांना अडथळा निर्माण करत होती. त्यामुळे सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग होत होता.
सदर महिलेवर दिघी पोलिस ठाण्यात गुरुवारी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.