सिंहगड घाटात दुचाकी संरक्षक कठड्याला धडकून तरुण-तरुणी गंभीर जखमी

सिंहगड घाटात दुचाकी संरक्षक कठड्याला धडकून तरुण-तरुणी गंभीर जखमी

 सिंहगड घाटात दुचाकी संरक्षक कठड्याला धडकून तरुण-तरुणी गंभीर जखमी 

पुणे, ता. २३ - सिंहगड घाटात दुचाकी संरक्षक कठड्याला धडकल्याने झालेल्या गंभीर अपघातात दुचाकीवरील तरुण-तरुणीचा जीव वाचला आहे. शनिवारी (ता. २३) सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. दुचाकी संरक्षक कठडल्याला जोरात धडकल्याने दुचाकीवर मागे बसलेली तरुणी थेट दरीत कोसळली आणि दुचाकी चालवणारा गंभीर जखमी झाला.  पूजा चव्हाण आणि सौरभ पासलकर अशी जखमींची नावे आहेत. स्थानिक नागरिक, वनसमितीचे सुरक्षारक्षक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकाने तत्परतने बचावकार्य केल्यामुळे हे तरुण-तरुणी वाचले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताची माहिती मिळताच वनसंरक्षण समितीचे शांताराम लांघे, तानाजी खाटपे, अमित जरांडे, संदीप सांबरे, भानुदास जोरकर, धनराज सांबरे, निलेश सांगळे तसेच कुसगावचे अविनाश मांजरे आणि आतकरवाडी येथील सुरेश सांगळे घटनास्थळी पोचले. सुरक्षारक्षकांनी दरीत उतरुन जखमी तरुणीला दरीतून वर आणले. वनविभागाचे समाधान पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन रेस्क्यू टीमला तसेच हवेली पोलिसांना घटनेची माहिती दिली. हवेली आपत्ती व्यवस्थापन पथक प्रमुख तानाजी भोसले आणि खानापूरचे पोलिस पाटील गणेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील पथक घटनास्थळी आले. आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या स्कॉर्पिओ वाहनातून जखमी दोघांना खासगी रुग्णालयात नेले. 

या अपघातात तरुणीच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे आणि तरुणाच्या डोक्याला गंभीर मार लागून नाक आणि कानातून रक्तस्त्राव झाला आहे. पोलिसांनी दोघांच्या नातेवाईकांना माहिती दिली. पुढील उपचारासाठी त्यांना पुण्यातील भारती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories