शेअर मार्केटचा तोटा भरून काढण्यासाठी मित्राची कार चोरी; आरोपी अटकेत

शेअर मार्केटचा तोटा भरून काढण्यासाठी मित्राची कार चोरी; आरोपी अटकेत

बावधन | २ ऑक्टोबर २०२६ : शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी मित्राची कार चोरी करून ती राजस्थानमध्ये विक्री करण्यासाठी घेऊन जाणाऱ्या आरोपीला बावधन पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी १४ लाख रुपये किमतीची होंडा एलिव्हेट कार जप्त केली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, प्रथम सोमेश्वरदास गुप्ता (रा. बावधन, पुणे) यांनी त्यांची नवीन होंडा एलिव्हेट कार चोरीला गेल्याची फिर्याद बावधन पोलीस ठाण्यात दिली होती. याप्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक ५२२/२०२६ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या सूचनेनुसार तपास पथकाने कार आणि चोरट्याचा शोध सुरू केला. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे चोरीची कार वाघोली, थेऊर, अहिल्यानगर, संभाजीनगर आणि चाळीसगाव मार्गे धुळेच्या दिशेने गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीचा पाठलाग सुरू केला.

तपासात  रोहन सत्यनारायण सोमाणी  (वय २६, रा. टी/३०६, एलिगंट सफायर सोसायटी, सरखेजगाव मार्ग, वाघोली, पुणे; मूळ रा. शिरपूर, जि. धुळे) याला कार आणि चोरीच्या ताब्यात घेतलेल्या मुद्देमालासह ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पोलिसांच्या चौकशीत आरोपीने शेअर मार्केटमध्ये झालेला तोटा भरून काढण्यासाठी वडील आणि इतरांकडून उसने पैसे घेतले होते. ते पैसे परत करण्यासाठी मित्र प्रथम गुप्ता याची कार चोरी करून ती राजस्थानमध्ये नेऊन विक्री करण्याचा विचार होता, अशी माहिती दिल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

आरोपीला १२ तासांच्या आत बावधन पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला ४ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories