पिंपरी-चिंचडवड : भोसरी एमआयडीसी परिसरात कंपनीतील ॲल्युमिनियम साहित्य कर्मचाऱ्यांनी संगमताने चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कंपनीतील कर्मचाऱ्यांसह ट्रान्सपोर्ट चालक आणि भंगार व्यावसायिकांनी मिळून 15 हजारांहून अधिक किमतीचे ॲल्युमिनियम साहित्य परस्पर विकल्याचा आरोप आहे. या प्रकरणी दहा जणांविरोधात पोलिसांत तक्रारहा जणांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, संबंधित कंपनीमध्ये स्टोअर विभागाशी संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कंपनीच्या विश्वासाचा गैरफायदा घेतला. कंपनीच्या उत्पादनासाठी आवश्यक असलेले चांगले मटेरियल, स्क्रॅप मटेरियल आणि पुनर्निर्मितीसाठी पाठविण्यात येणारे ॲल्युमिनियम साहित्य यामध्ये गैरव्यवहार करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
तक्रारीनुसार, कंपनीतील साहित्य ट्रान्सपोर्ट वाहनांमधून पाठविताना संबंधित चालकांच्या मदतीने साहित्याची वाहतूक करण्यात आली. त्यानंतर हे साहित्य भंगार व्यावसायिकांना विकून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतल्याचा आरोप आहे. या संपूर्ण प्रकारात कंपनीतील कर्मचारी, साहित्य वाहतुकीशी संबंधित व्यक्ती आणि भंगार व्यावसायिक अशा एकूण दहा जणांविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
या कथित गैरव्यवहारामुळे कंपनीचे सुमारे 15 लाख 40 हजारांचे आर्थिक नुकसान झाले आहे. या प्रकरणी उत्तर महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक ज्योश्ना खरात आणि पोलीस निरीक्षक मालमत्ता गुन्हा विरोधी पथकाद्वारे करण्यात येत आहे.