पत्नीवर वाईट नजर ठेवल्याच्या संशयातून वाद; तरुणावर जीवघेणा हल्ला

पत्नीवर वाईट नजर ठेवल्याच्या संशयातून वाद; तरुणावर जीवघेणा हल्ला

पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड परिसरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहेत. नुकतेच पत्नीकडे पाहिल्याच्या संशयावरून झालेल्या वादात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून चाकण दक्षिण पोलिस प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यातील गवतेवस्ती, मेदनकरवाडी परिसरात 6 नोव्हेंबरच्या सकाळी 9.30च्या सुमारास ही घटना घडली. एका तरुणावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला करण्यात आला. या प्रकरणी चाकण दक्षिण पोलिस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाखाली गुन्हा संबंधित हल्लेखोराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपी तक्रारदाराच्या पत्नीकडे वाईट नजरेने पाहत होता. यावरून त्या दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला. हा वाद इतका वाढला की आरोपीने तक्रारदाराच्या तोंडावर, डोक्यावर आणि खांद्यावर धारदार शस्त्राने वार केला. या हल्ल्यात तक्रारदार गंभीर जखमी झाला. हल्ला केल्यानंतर आरोपी  घटनास्थळावरून पसार झाल्याचे तक्रारीत नमूद आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, इनामुल हक अब्दुल बारक (वय २३) याने शाहीजुद्दीन इस्लाम (वय 22) याच्याविरोधात ही तक्रार दाखल केली आहे.  

याप्रकरणी चाकण दक्षिण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या कलम १०९(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चाकण पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक धायगुडे तपास करीत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories