मुळशीत बेकायदेशीर हुक्का विक्री; दोघांवर गुन्हा दाखल

मुळशीत बेकायदेशीर हुक्का विक्री; दोघांवर गुन्हा दाखल

मुळशी : मुळशी तालुक्यात भुगाव रोड परिसरातील एका हॉटेलमध्ये बेकायदेशीरपणे हुक्का विक्री सुरू असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोनजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी 68 हजारांचे प्रतिबंधित हुक्का साहित्य जप्त केले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भुगाव रोडवरील कोकोरिको स्मोक बार अँड किचन या हॉटेलमध्ये 15 नोव्हेंबरच्या सायंकाळी 7.15च्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या कारवाईदरम्यान पोलिसांना हॉटेलमध्ये विनापरवाना आणि अनधिकृतरीत्या ग्राहकांना हुक्का पुरविण्यासाठी साहित्य उपलब्ध करून देण्यात येत असल्याचे निदर्शनास आले. 

पोलिसांना या ठिकाणी एकूण 11 हुक्क्यांचे पॉट, प्रतिबंधित फ्लेवर्स आणि इतर साहित्य आढळले. या साहित्याची एकूण किंमत 68 हजार 300 रुपये असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार नितीन बाळासाहेब लोखंडे यांनी तक्रार दिली असून मोहम्मद शोएब अन्सारी (वय 32) आणि पंकज भुवन जोशी (वय 40) यांच्याविरोधात बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांवर स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी  प्रतिबंधित हुक्का साहित्य ग्राहकांना विक्री करण्याच्या उद्देशाने जवळ बाळगल्याचा आरोप करण्यात आला आहे.

भारतीय न्याय संहिता कलम 275, 278, 3(5) तसेच सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने अधिनियम 2003मधील कलम 4(अ) व 21(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक शितल गिरी या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories