हिंजवडीत बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू ; मालक-ठेकेदार अडचणीत

हिंजवडीत बांधकाम कामगाराचा दुर्दैवी मृत्यू ; मालक-ठेकेदार अडचणीत

पिंपरी-चिंचवड : हिंजवडीत बांधकाम साईटवर भीषण अपघाताची घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, 23 वर्षीय तरुण कामगाराचा चौथ्या मजल्यावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणी मालक आणि ठेकेदाराविरोधात हिंजवडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुळशी तालुक्यातील मारुंजी परिसरात 14 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. सकाळी 11.30च्या सुमारास तरुण कामगार बांधकामस्थळी चौथ्या मजल्यावर मिनी क्रेनच्या ट्रॉलीला जोडणी करण्याचे काम सुरू असताना तोल जाऊन खाली पडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. महेश रामराव राठोड असे या मृत तरुण कामगाराचे नाव आहे.

या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी बांधकाम साइट मालक संतोष माणिक राठोड (वय ३८) आणि ठेकेदार अमोल दिलीप चव्हाण (वय ३९) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. संबंधित बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेसाठी आवश्य संरक्षक जाळी लावण्यात आली नव्हती. तसेच कामगारांना सेफ्टी बेल्ट, हेल्मेट यांसारखी सुरक्षेची साधनेही पुरविण्यात आली नव्हती.

कामगार उंचावर काम करत असताना तोल जाऊन खाली पडल्यास त्याचा मृत्यू होऊ शकतो, याची जाणीव असूनही आवश्यक सुरक्षा उपाययोजना न करता काम करून घेतल्याचा आरोप बांधकाम साइट मालक आणि ठेकेदाराविरोधात करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलीस हवालदार विशाल शिवदर्शन बिरजदार यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंजवडी पोलीस ठाण्यात १६ नोव्हेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता (BNS) कलम १०५ व ३(५) अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप वांगणेकर पुढील तपास करीत आहेत.







Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories