भोसरीमध्ये सोमवारी वधू-वर परिचय मेळावा
पिंपरी, ता. २३ - श्री संत सेना महाराज प्रकटदिनानिमित्त महाराष्ट्र नाभिक महामंडळ पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन केले आहे. हा मेळावा सोमवारी (ता. २५) सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या वेळेत आळंदी रोड, भोसरी येथील दुर्गाकृपा लॉन्स येथे होणार आहे.
मेळाव्याचे उद्घाटन खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते होणार आहे. जय (बाबा) माऊली महाराज वाळुंजकर, आमदार लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, हेश लांडगे, आमदार अमित गोरखे, महापौर रखी लांडगे रवी बेलपत्रे, सयाजी झुंजार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.