'परिसरातील शांतता-सुरक्षिततेसाठी नागरिक व पोलिस प्रशासनात समन्वय महत्त्वाचा'

'परिसरातील शांतता-सुरक्षिततेसाठी नागरिक व पोलिस प्रशासनात समन्वय महत्त्वाचा'

'परिसरातील शांतता-सुरक्षिततेसाठी नागरिक व पोलिस प्रशासनात समन्वय महत्त्वाचा' 

वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांचे नागरीकांना मार्गदर्शन, कुदळवाडी ग्रामस्थ व पोलिस प्रशासन यांची संयुक्त महत्वपूर्ण बैठक  

पिंपरी, ता. २३ - ''नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन सदैव तत्पर आहे. परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नागरिक व पोलिस प्रशासन यांच्यातील समन्वय अत्यंत महत्त्वाचा आहे.'', असे चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी सांगितले. कुदळवाडी परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन व घरमालक यांची महत्वपूर्ण बैठक नुकतीच पार पडली. 

या बैठकीत चिखली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांनी परिसरातील नागरिक, घरमालक व भाडेकरुंना मार्गदर्शन केले. प्रत्येक घरमालकाने आपल्या भाडेकरुंची संपूर्ण माहिती पोलिस स्टेशनमध्ये नोंदविणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. परिसरातील वाढती लोकसंख्या, बाहेरुन येणारे नागरिक, सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक खबरदारी, संशयास्पद हालचालींवर लक्ष ठेवणे, सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर, महिला व ज्येष्ठ नागरिकांची सुरक्षितता, वाहतूक समस्या तसेच सामाजिक सलोखा कायम राखण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळुंखे साहेब नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. 

या बैठकीस परिसरातील अनेक घरमालक, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, युवक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी देखील विविध समस्या मांडत पोलिस प्रशासनाच्या उपक्रमाचे स्वागत केले व भविष्यातही पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका व्यक्त केली. कुदळवाडी परिसर सुरक्षित, शांततामय आणि गुन्हेमुक्त ठेवण्यासाठी अशा प्रकारच्या बैठका नियमितपणे आयोजित करण्यात याव्यात, अशी मागणीही उपस्थित नागरिकांनी केली.

यावेळी कुदळवाडी ग्रामस्थ रमेश मोरे, दिनेश यादव, किशोर बालघरे, गुलाब मोरे, बाळासाहेब मोरे, उत्तम बालघरे, दिपक ठाकुर, अनिल यादव, विशाल बालघरे, दत्तात्रय हरगुडे, विजयराज यादव, दादा मोरे, निखील मोरे,अमोल बालघरे, बापू होले, गणेश बालघरे, निलेश यादव, तानाजी मालुसरे, संदिप पवार, ज्ञानेश्वर आरुडे, प्रतिक मोरे, योगेश यादव,अमित बालघरे, विशाल बनसोडे, सोमनाथ यादव, दिपक घन, विकास यादव,सागर बालघरे, आकाश किवळे, दिनेश मोरे, किरण यादव, गणेश यादव, लक्ष्मण सगळे, नंन्न्या बांदल, गणेश मोरे, हर्षवर्धन मोरे उपस्थित होते. नगरसदस्य भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव यांनी आभार मानले. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories