३१ मे रोजी प्रत्येक बूथवर ‘मन की बात’व ‘कार्यकर्ता टिफिन बैठक’ घेण्याचे भाजप कायकर्त्यांना आवाहन
३१ मे रोजी प्रत्येक बूथवर ‘मन की बात’व ‘कार्यकर्ता टिफिन बैठक’ घेण्याचे भाजप कायकर्त्यांना आवाहन
पिंपरी, ता. २३ - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ३१ मे रोजी होणारा ‘मन की बात’प्रसारण कार्यक्रम सकाळी ११ वाजता बूथ स्तरावर आयोजित करावा आणि त्यासोबत कार्यकर्त्यांमध्ये संवाद, समन्वय आणि आत्मीयता वाढविण्यासाठी‘कार्यकर्ता टिफिन बैठक’घ्यावी. प्रत्येक बूथवर कार्यकर्त्यांची १०० टक्के उपस्थिती असावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना केले आहे.
त्यानुसार, आमदार शंकर जगताप यांनीही पिंपरी-चिंचवडमधील कार्यकर्त्यांसाठी हे आवाहन प्रसिद्ध केले आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘कार्यकर्ता टिफिन बैठक’हा उपक्रम कार्यकर्त्यांमधील विचारांची देवाणघेवाण, आपुलकी आणि संघटनात्मक बांधिलकी अधिक दृढ करण्यासाठी प्रभावी माध्यम ठरणार आहे. बूथ स्तरावर संघटन अधिक मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवणे आवश्यक आहे.
रविवार, दिनांक ३१ मे २०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता बूथ स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या उपक्रमात पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने उत्स्फूर्त सहभाग नोंदवून बूथ सशक्तीकरणाच्या संकल्पनेला अधिक बळ द्यावे.
टिफीन बैठक संकल्पना - ‘कार्यकर्ता टिफिन बैठक’ हा प्रामुख्याने भारतीय जनता पक्षातर्फे (BJP) सुरु केलेला एक अनौपचारिक राजकीय उपक्रम आहे. यामध्ये पक्षाचे वरिष्ठ नेते आणि बूथ स्तरावरील कार्यकर्ते एकत्र येतात. प्रत्येकजण घरून स्वतःचा डबा (टिफिन) आणतात आणि सर्वजण मिळून एकत्र जेवतात. त्यातून कार्यकर्त्यांमधील दुरावा कमी होतो आणि बंधुभाव व एकोपा वाढीस लागतो.