रावेतमध्ये परवान्याशिवाय कॅफे चालवून आक्षेपार्ह प्रकार, पोलिसांची कारवाई
पिंपरी, ता. २६ - रावेत परिसरात परवान्याशिवाय कॅफे चालवून आक्षेपार्ह प्रकारांना जागा उपलब्ध करुन दिल्याप्रकरणी एका कॅफे मालकाविरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९, १३१ (अ अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई सोमवारी (ता. २५) सायंकाळी ७ वाजण्यापूर्वी कॅफे क्रेझी लव्हर्स, शॉप नं. ४, ब्लूमिंग डेल अपार्टमेंट, डॉमिनोज पिझ्झा जवळ, रावेत येथे करण्यात आली. आरोपी कैलास किसन काशिद (वय २४, रा. शिवशंभो हौसिंग सोसायटी, भगवती इंग्लिश मीडियम शाळेजवळ) याने कोणताही परवाना नसताना कॅफे चालवत होता. कॅफेमध्ये कॉफी बोर्ड लावून वरच्या मजल्यावर अंधाऱ्या खोल्यांमध्ये तरुण-तरुणींना बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. तसेच तेथे आक्षेपार्ह प्रकार घडत असल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आरोपीवर रावेत पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १२९,१३१ (अ अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.