टेम्पोचा धक्का लागून पडल्याने टेम्पोचालकाला जबर मारहाण

टेम्पोचा धक्का लागून पडल्याने टेम्पोचालकाला जबर मारहाण

टेम्पोचा धक्का लागून पडल्याने टेम्पोचालकाला जबर मारहाण 

पिंपरी, ता. २६ - मुळशी तालुक्यातील भुकूम येथे वाहतूकीदरम्यान झालेल्या किरकोळ धक्क्याच्या वादातून टेम्पो चालकाला मारहाण करुन वाहनाची तोडफोड केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना रविवारी (ता. २४)  रात्री ८.४५ वाजता मानस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलसमोर, भूगांव–पौड रोड येथे घडली. फिर्यादी रोहित रघुनाथ घारे (वय १९, रा. पिरंगुट, ता. मुळशी) हा मारुती सुझुकी सुपर कॅरी टेम्पोने जात असताना त्यांच्या वाहनाचा आरोपींच्या टीव्हीएस अपाची दुचाकीला धक्का लागला.

या कारणावरुन आरोपी श्लोक रावल आणि मोहित शर्मा (दोघेही रा. वनालिका अपार्टमेंट, पिरंगुट) यांनी फिर्यादी रोहितशी वाद घालत टेम्पोची समोरील काच फोडली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करत स्टीलच्या कड्याने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले, असे फिर्यादीत नमूद आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२), ३२४(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटक नाहीत. 




Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories