निष्काळजीपणे वाहन चालवत दुसऱ्याच्या वाहनाला धडक, वडील व मुलीविरोधात गुन्हा
Apr 24 2026
41
निष्काळजीपणे वाहन चालवत दुसऱ्याच्या वाहनाला धडक, वडील व मुलीविरोधात गुन्हा
पिंपरी, ता. २४ - स्वतः निष्काळजीपणे वाहन चालवत दुसऱ्या वाहनाला धडक देऊन त्या वाहनाचे नुकसान करणाऱ्या वडील व मुलीविरोधात गुरुवारी (ता. २३) हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये १९ वर्षीय युवती वाहन चालवत होती. हा प्रकार बुधवारी (ता. २२) हिंजवडी येथील इंन्फोसीस सर्कलजवळ घडला आहे.
याबाबत, वरद मनोज पितळे (वय १९ वर्षे, रा. सूसगाव) या युवकाने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पंढरीनाथ उकीरडे व त्यांची मुलगी दिव्या पंढरीनाथ उकीरडे (वय १९ वर्षे, व्यवसाय नोकरी रा. माण) हे आरोपी आहेत. फिर्यादी वरद आईला घेण्यासाठी आपल्या कारमधून जात होता. त्यावेळी, आरोपी दुचाकीस्वार युवतीने हयगयीने बेदरकारपणे वाहन चालवून वरदच्या कारला धडक देउन पाठीमागील बंपर आणि पाठीमागील उजव्या दरवाजाचे नुकसान केले. फिर्यादी वरदच्या मावशीस धक्काबुक्की केली. ''तुम्हास काय करायचे ते करा.'', असे म्हणून हे वडील व मुलगी तेथून निघून गेले. धमकी देउन आपल्या मूलीसह अपघात ठिकानाहून निघून
आरोपींविरोधात हिंजवडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१, ३२४ (४), ११५ (२), ३५१(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.