news
clock
पान मसाला पुडीचे पैसे देण्यावरुन वाद, टोळक्याची तरुणाला जबर मारहाण

पान मसाला पुडीचे पैसे देण्यावरुन वाद, टोळक्याची तरुणाला जबर मारहाण

 पान मसाला पुडीचे पैसे देण्यावरुन वाद, टोळक्याची तरुणाला जबर मारहाण 

पिंपरी, ता. २४ - पान मसाला पुडीचे पैसे देण्यावरुन वाद घालून चार जणांच्या टोळक्याने ३९ वर्षीय तरुणाला लाथाबुक्क्यांनी ठार मारण्याची धमकी देऊन जबर मारहाण केली. हा प्रकार १७ एप्रिलला खेड तालुक्यातील कडाची वाडी येथे मौजे गावठी हॉटेल येथे पान टपरीवर घडला आहे. या प्रकरणी चार आरोपींवर दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात गुरुवारी (ता. २३) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत, मारहाण झालेले संदिप हनुमंत कोतवाल (वय ३९ वर्ष, रा. कडाची वाडी, ता. खेड) यांनी फिर्याद दिली आहे. सिध्देश मुंगसे, संकेत मुंगसे  व इतर दोन इसम या घटनेतील आरोपी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मौजे गावठी हॉटेल पान टपरीवर पान मसाला पुडीचे पैसे देण्यावरुन आरोपी तरुण व फिर्यादी यांच्यात वाद झाला. हॉटेलचे मालक सिद्धेश मुंगसे यांचा भाऊ संकेत मुंगसे व सोबतच्या दोघांनी फिर्यादी संदिप यांना शिवीगाळ करुन हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. जीव मारण्याची धमकीही दिली त्यात फिर्यादीचा पाय फॅक्चर झाला आहे.  

चारही आरोपींवर दक्षिण चाकण पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहीता कलम ११७ (२), ३५२, ३५१ (२), ११५ (२) ३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories