नायर कॉलनी-चिखली येथे घरफोडीची घटना, परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी
Jul 11 2026
53
नायर कॉलनी-चिखली येथे घरफोडीची घटना, परिसरात रात्रीची गस्त वाढवण्याची नागरिकांची मागणी
पिंपरी, ता. ११ जुलै २०२६ - चिखली येथील नायर कॉलनी परिसरातील जरे हाइट्स आणि विनीत हाइट्स येथे शनिवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास घरफोडीची घटना घडल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी पोलिस प्रशासनाकडे केली आहे.
वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढते आहे, यावर पोलिस प्रशासनाने तातडीने कठोर उपाययोजना कराव्यात. तसेच परिसरात वाढत्या चोरी आणि घरफोडीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर रहिवाशांनी रात्रीच्या वेळी विशेष काळजी घ्यावी, घराचे मुख्य गेट, सेफ्टी डोअर, खिडक्या तसेच सीसीटीव्ही यंत्रणा व्यवस्थित कार्यरत असल्याची खात्री करून घ्यावी. तसेच रात्री उशिरापर्यंत परिसरात फिरणाऱ्या संशयित व्यक्तींवर लक्ष ठेवावे, सर्वांनी आपल्या सुरक्षेबाबत अधिक दक्ष राहावे, नागरिकांनी एकमेकांशी समन्वय राखून परिसरात 'नेबरहुड वॉच' पद्धतीने सतर्क राहावे. कोणतीही संशयास्पद हालचाल, अनोळखी व्यक्ती किंवा संशयास्पद वाहन दिसल्यास तात्काळ शेजाऱ्यांना माहिती देऊन पोलिसांशी संपर्क साधावा, असे असे आवाहन येथील ह्युमन राईट्स अॅक्टिव्हेस्ट असोसिएशने सर्वांना केले आहे.
नागरिकांनी कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ पोलिस नियंत्रण कक्ष क्रमांक ११२ वर संपर्क साधावा तसेच स्थानिक पोलीस ठाण्यालाही त्वरित माहिती द्यावी, अशी सूचनाही असोसिएशनचे प्रतिनिधी सचिन आमले यांनी केली आहे.

- Citizens Demand, Police Administration, Public Safety, CCTV Surveillance, Neighborhood Watch, Suspicious Persons
- Nair Colony, Chikhali, House Break-in, Burglary, Theft, Residential Burglary, Pimpri Chinchwad, Pune, Police Patrol, Night Patrolling
- पोलिस नियंत्रण कक्ष ११२, सचिन आमले, ह्युमन राईट्स अॅक्टिव्हेस्ट असोसिएशन
- पोलिस गस्त, रात्रीची गस्त, नागरिकांची मागणी, पोलिस प्रशासन
- नायर कॉलनी चिखली, घरफोडी, चोरी, घरफोडीची घटना