चिंबळीत जेष्ठ नागरिक चार महिन्यांपासून बेपत्ता ; शोधून देणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस

चिंबळीत जेष्ठ नागरिक चार महिन्यांपासून बेपत्ता ; शोधून देणाऱ्याला १ लाखाचं बक्षीस

पिंपरी-चिंचवड : खेड तालुक्यातील चिंबळी येथील एक जेष्ठ नागरिक गेल्या चार महिन्यांपासून बेपत्ता आहेत. या प्रकरणी त्यांच्या कुटुंबीयांना नागरिकांकडे मदत मागितली आहे. ऑगस्ट महिन्यात घरातून बाहेर पडलेले हे ज्येष्ठ नागरिक घरी परतले नाहीत. त्यांना शोधू देणाऱ्यास एक लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे. 

कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन शिवराम बहिरट (वय ७८) हे 23 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9.45 वाजता चिंबळी (ता. खेड, जि. पुणे) येथील घरातून बाहेर पडले. त्यानंतर ते घरी परतलेच नाहीत. त्यांना विस्मरणाचा त्रास असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले आहे.

बहिरट यांची उंची 5 फूट 6 इंच असून त्यांचा बांधा सडपातळ आणि वर्ण गव्हाळ आहे. घरातून बाहेर पडताना त्यांनी काळे पट्टे असलेला राखाडी रंगाचा टी-शर्ट आणि राखाडी बरमूडा घातला होता. 

बहिरट यांच्याबाबत काही माहिती असल्यास किंवा वर्णनाशी जुळणारी व्यक्ती दिसल्यास, ती व्यक्ती कुठे आणि किती वाजता दिसली याची माहिती कुटुंबाला कळवावी. संपर्कासाठी आवाहनात 9850957679, 8459178598 आणि 9767167626 हे क्रमांक देण्यात आले आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories