news
clock
मौजे चोविसावाडी येथील नागरी समस्यांबाबत प्रशासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ नागरीकांचा धडक मोर्चाचा इशारा

मौजे चोविसावाडी येथील नागरी समस्यांबाबत प्रशासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ नागरीकांचा धडक मोर्चाचा इशारा

 मौजे चोविसावाडी येथील नागरी समस्यांबाबत प्रशासनाच्या उदासीनतेच्या निषेधार्थ नागरीकांचा धडक मोर्चाचा इशारा

पिंपरी, ता. २४ - मौजे चोविसावाडी परिसरात रस्ते, वीज, गटार व्यवस्था, पिण्याचे पाणी, आरोग्य सुविधा या मुलभूत नागरी समस्यांमुळे नागरीक वैतागले आहेत. महापालिकेला वारंवार तक्रारी देऊन व पाठपुरावा करुनही कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला आहे. महापालिका प्रशासनाने तत्काळ येथील अडचणी सोडवाव्यात. अन्यथा प्रशासनाच्या निष्क्रिय आणि उदासीन भूमिकेच्या निषेधार्थ चोविसावाडी येथील नागरीक ७ मे २०२६ रोजी ई क्षेत्रीय कार्यालयावर धडक मोर्चा काढणार आहे, अशा इशारा भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या प्रदेश माजी कोशाध्यक्षा शैला मोळक यांनी दिला आहे. 

परिसरातील नागरीकांना भेडसावणाऱ्या नागरी समस्यांबाबत भाजपचे जेष्ठ नेते बाळासाहेब मोळक व काळेभिंत ग्रामस्थ यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे महापौर रवी लांडगे व आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना निवेदन दिले आहे. याशिवाय, क्षेत्रीय कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन दिले आहे. मात्र, या निवेदनावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही. सदर निवेदनात मोळक यांनी चोविसावाडी परिसरातील समस्या सविस्तरपणे मांडल्या आहेत. 

निवेदनात म्हटले आहे की, चोविसावाडी हे गाव पिंपरी-चिचवड महानगरपालिकेत सन १९९७ साली समाविष्ट झालेले आहे. मात्र, २५ वर्षांनंतर आज सन २०२६ उजाडले तरीही हे गाव मुलभूत सुविधांपासून वंचित राहिले आहे. येथील आम्ही सर्व नागरीक नियमितपणे कर भरत आहोत, तरीही आम्हाला या समस्यांचा सामना करावा लागत आहे याची खंत वाटते. 

या आहेत समस्या -

१) डीपी रस्ते पूर्ण झालेले नाहीत.

२) रुग्णवाहिका या ठिकाणी येण्यासाठी मार्ग नाही.

३) अग्निशमन वाहन आत येण्यासाठी मार्ग नाही.

४) पिण्याचे पाणी वेळेत व मुबलक येत नाही.

५) एखादी व्यक्ती मयत झालेस त्याच्या अंत्यविधी जाण्याकरीता रस्ता उपलब्ध नाही

६) लहान मुलांना शाळेमध्ये जाण्यायेण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे.

७) या ठिकाणी नियमितपणे साफसफाई होत नाही व कचरागाडी येण्यासाठीही रस्ता नाही. 

८) वीजपुरवठा दुरुस्तीसाठी जाण्यायेण्यासाठी पुरेशी जागा नाही 

९) अनेक पथदिवे बंद आहेत.

१०) सदर भागामध्ये ड्रेनेज लाईनचा अभाव आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories