गुणवत्तावाढीसाठी महापालिका शाळांमध्ये होणार बदल, ख्यातनाम शिक्षक दत्तात्रेय वारे यांचे मार्गदर्शन लाभणार

गुणवत्तावाढीसाठी महापालिका शाळांमध्ये होणार बदल, ख्यातनाम शिक्षक दत्तात्रेय वारे यांचे मार्गदर्शन लाभणार

गुणवत्तावाढीसाठी महापालिकेच्या शाळांमध्ये होणार बदल, ख्यातनाम शिक्षक दत्तात्रेय वारे यांचे मार्गदर्शन लाभणार

पिंपरी, ता. १२ -शिरुर तालुक्यातील वाबळेवाडी आणि खेडतालुक्यातील जालिंदरनगर येथील शाळांमध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रेय वारे यांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकास घडवणारे प्रयोग केले आहेत. आता वारे गुरुजींच्या मार्गदर्शनाने येणाऱ्या शैक्षणिक वर्षात पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळांमध्येही बदल केले जाणार आहे. त्याची सुरवात भोसरीतील शाळेपासून करण्यात आली आहे. या बदलांमधून महापालिकेच्या शाळांचा दर्जा आणखी उंचावणार आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी गुरुवारी (ता. ११) दिली.   

मोरवाडी-पिंपरी येथील महापालिकेच्या दिव्यांग भवनामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शहरातील विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्या, उद्योग समूहांसोबत संवाद बैठकीत महापालिकेच्या शाळांची गुणवत्ता वाढवण्यासाठीच्या उपक्रमांबाबत चर्चा झाली. यावेळी, सहभागी कंपन्यांना  वारे गुरुजींनी केलेल्या शैक्षणिक उपक्रमांची माहिती देण्यात आली. राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रेय वारे यांचा महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. 

महापौर लांडगे म्हणाले, ''राष्ट्रीय पुरस्कार विजेते आदर्श शिक्षक दत्तात्रय वारे गुरुजी यांनी शासकीय शिक्षण व्यवस्थेमध्ये केलेले कार्य प्रेरणादायी आणि अनुकरणीय आहे. त्यांनी विकसित केलेली शिक्षणपद्धती विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी असून, गुणवत्तापूर्ण शिक्षण प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रभावी मार्ग त्यांनी दाखवून दिला आहे. शिक्षण क्षेत्रात त्यांनी घडवून आणलेली सकारात्मक क्रांती ही केवळ काही शाळांपुरती मर्यादित नसून ती राज्य आणि देशपातळीवर विस्तारत आहे.त्यांचे अनुकरण केले पाहिजे.'' वारे गुरुजींनी मनोगत व्यक्त केले.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Related News

Top Categories