आपल्या देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा, केंद्र सरकारची माहिती

आपल्या देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा, केंद्र सरकारची माहिती

आपल्या देशात कच्च्या तेलाचा पुरेसा साठा, केंद्र सरकारची माहिती 

पुणे, ता. 18 - आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीचा  परिणाम आपल्या कच्च्या तेलाच्या, एलपीजीच्या आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवर  झाला आहे. मात्र, आपल्या तेल शुद्धीकरण कारखाने सामान्यपणे कार्यरत आहेत आणि आपल्याकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आहे., अशी माहिती केंद्र सरकारने दिली आहे

 पेट्रोलियम मंत्रालयाच्या सहसचिव सुजाता शर्मा यांनी नुकतेच सांगितले की, तेल, वायू किंवा इतर कोणत्याही जीवनावश्यक वस्तूंची कमतरता नाही. पश्चिम आशियातील संकट सुरु होऊन अडीच महिन्यांहून अधिक काळ लोटला आहे. होर्मुझच्या सामुद्रधुनीतील परिस्थिती अजूनही सामान्य नाही. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल, नैसर्गिक वायू आणि एलपीजीच्या किमती लक्षणीयरीत्या वाढल्या आहेत.

या सर्व घटकांमुळे आपल्या कच्च्या तेलाच्या, एलपीजीच्या आणि नैसर्गिक वायूच्या आयातीवरही परिणाम झाला आहे. आपल्या तेल शुद्धीकरण कारखाने सामान्यपणे कार्यरत आहेत आणि आपल्याकडे कच्च्या तेलाचा पुरेसा साठा आहे. पत्रकार परिषदेदरम्यान ही माहिती देण्यात आली.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories