news
clock
माता रमाई आंबेडकर यांच्या देशातील पहिल्या स्मारकाचा मंगळवारी पिंपरीमध्ये भूमीपूजन समारंभ

माता रमाई आंबेडकर यांच्या देशातील पहिल्या स्मारकाचा मंगळवारी पिंपरीमध्ये भूमीपूजन समारंभ

माता रमाई आंबेडकर यांच्या देशातील पहिल्या स्मारकाचा मंगळवारी पिंपरीमध्ये भूमीपूजन समारंभ

पिंपरी, ता. २४ - पिंपरी येथील भीमसृष्टीच्या शेजारी माता रमाई आंबेडकर यांचे भव्य स्मारक पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारले जाणार आहे. या स्मारकासाठी भूमीपूजन समारंभ मंगळवारी (ता. २८) सकाळी  ११ वाजता केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते होणार आहे. माता रमाईंचे हे आपल्या देशातील पहिले स्मारक आहे.  महापौर रवी लांडगे यांनी शुक्रवारी (ता. २४) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

गेली अनेक वर्षे या प्रकल्पाचे काम प्रलंबित होते. यंदा ११ एप्रिलला स्मारकाचे भूमिपूजन होणार होते मात्र निविदा प्रक्रियेमुळे विलंब झाला. आता २८ एप्रिलला स्मारकाच्या कामास प्रारंभ होईल. पिंपरी येथील  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारील २५ हजार चौरस फूट जागेवर  रमाईंचे स्मारक साकारले  जाणार आहे. या दुमजली स्मारकामध्ये माता रमाईंचा भव्य पुतळा उभारला जाणार आहे. रमाईंचा जीवनपट उलगडणारी २५ म्युरल्स, अभ्यासिका स्मारकामध्ये असणार आहे. देखणी विद्युत रोषणाई तसेच मनोहारी कारंजे या स्मारकाच्या सौंदर्यात भर घालेल. या स्मारकासाठी साडेतेवीस कोटी रुपये खर्च येणार आहे. येत्या दोन वर्षात हे स्मारक पूर्णत्वास जाईल.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाशेजारी माता रमाईंचे स्मारक साकारणार असल्याने या पिंपरी परिसर हे महत्त्वाचे प्रेक्षणीय स्ठळ बनणार आहे. बाबासाहेबांचे अनमोल कार्य आणि माता रमाईंनी त्यांच्यासाठी केलेला त्याग या स्मारकांमधून आपल्याला जाणून घेता येणार आहे. 



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories