अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची निवड यादी २९ मे रोजी जाहीर होणार
May 26 2026
12
अकरावी प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची निवड यादी २९ मे रोजी जाहीर होणार
पुणे, ता. २६ - इयत्ता अकरावीची प्रवेशप्रक्रिया सुरु झाली आहे. प्रवेशासाठी आतापर्यंत १२ लाख ४९ हजार ५०६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रवेश प्रक्रियेतील पहिल्या नियमित फेरीची निवड यादी आणि कट-ऑफ येत्या शुक्रवारी (ता. २९) जाहीर होणार आहे. निवड यादीतील विद्यार्थ्यांना तीन जूनपर्यंत प्रत्यक्ष महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करता येणार आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली.
राज्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागातर्फे इयत्ता अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. राज्यातील नऊ हजार ५९१ कनिष्ठ महाविद्यालयांमधील २१ लाख ५९ हजार ५३ जागांवरील प्रवेशासाठी ही प्रक्रिया होत आहे. 'कॅप' म्हणजे सर्वसमावेशक व पारदर्शक पद्धतीने १७ लाख ४२ हजार ४२३ जागा उपलब्ध आहेत. व्यवस्थापन, इन-हाऊस (ज्या शाळेतून तुम्ही दहावी उत्तीर्ण झाला आहात, त्याच संस्थेच्या (Parent Institute) ज्युनिअर कॉलेजमध्ये ११ वी प्रवेशासाठी राखीव ठेवण्यात आलेल्या जागा) आणि अल्पसंख्याक कोट्यांतर्गत चार लाख ५६ हजार २४३ जागा उपलब्ध आहेत. कोट्यांतर्गत आतापर्यंत ३९ हजार ६१३ प्रवेश निश्चित झाले आहेत.
विभागनिहाय नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची आकडेवारी -
पुणे - नोंदणी केलेले एकूण विद्यार्थी - २,०७,७९४
विद्यार्थी - १,०५,७६५
विद्यार्थिनी - १,०१,९२७
अर्ज अंतिम केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या - १,८८,२२८
- माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभाग, School Education Department,
- , डॉ. महेश पालकर, Dr Mahesh Palkar,
- केंद्रीय प्रवेश प्रक्रिया, Centralized Admission Process,
- इयत्ता अकरावी, FYJC Admission, पुणे, Pune, पहिली नियमित फेरी, First Merit List, निवड यादी, Selection List, कट-ऑफ, Cut Off, ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया, Online Admission Process,
- अकरावी प्रवेश प्रक्रिया, Class 11 Admission Process