जनगणनेच्या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही - आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी
पिंपरी, ता. २६ - '' जनगणना ही अत्यंत महत्त्वाची आहे. जनगणनेच्या कामात कोणताही निष्काळजीपणा, टाळाटाळ किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही. जनगणना अचूक, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वय ठेवून जबाबदारीने काम करणे आवश्यक आहे. जनगणनेदरम्यान माहिती संकलन, नोंदींची अचूकता आणि प्रशासकीय कामकाजामध्ये दक्षता बाळगावी. या कामामध्ये दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करा.'', असे निर्देश आयुक्त तथा प्रधान जनगणना अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिले.
जनगणना प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात केले होते, त्यावेळी आयुक्त सूर्यवंशी बोलत होते. जनगणनेतील प्रत्येक नोंद अचूक राहील याची काळजी घ्यावी. जनगणना ही नियमित शासकीय प्रक्रिया नसून भविष्यातील विकास आराखडे, नागरी सुविधा आणि धोरणनिर्मितीसाठी आधारभूत माहिती उपलब्ध करुन देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम आहे, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी नमूद केले.
अचूक जनगणनेसाठी प्रशासनाकडून सतत मार्गदर्शन
''जनगणना प्रक्रियेमध्ये अचूक माहिती संकलन आणि वेळेचे नियोजन अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रगणक, पर्यवेक्षक आणि संबंधित विभागांनी समन्वय राखून नागरिकांशी प्रभावी संवाद साधत ही प्रक्रिया सुरळीत पूर्ण करावी. प्रत्येक नोंद विश्वसनीय आणि त्रुटीविरहित राहण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने देखरेख आणि मार्गदर्शन केले जात आहे.''
- सचिन पवार, उपायुक्त तथा शहर जनगणना अधिकारी, महापालिका
- , अचूक नोंदी, Accurate Records, प्रशासकीय कामकाज, Administrative Work, हलगर्जीपणा, Negligence,
- जनगणना प्रक्रिया, Census Process, माहिती संकलन, Data Collection,
- पिंपरी चिंचवड महानगरपालिका, PCMC, जनगणना अधिकारी, Census Officer, आयुक्त, Municipal Commissioner,
- जनगणना, Census, डॉ. विजय सूर्यवंशी, Dr Vijay Suryawanshi,