पिंपरी-चिंचवड : काळेवाडीत सार्वजनिक ठिकाणी उभी केलेली दीड लाख रुपये किमतीची रिक्षा चोरीला गेल्याची तक्रार मिळाली आहे. या प्रकरणी काळेवाडी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडीत विजयनगर बसथांब्याजवळ सार्वजनिक रस्त्यावर ही घटना घडली. राकेश विठ्ठल टोणपे (वय 35, रा.काळेवाडी) यांनी रिक्षा चोरीची तक्रार दिली आहे. टोणपे हे रिक्षाचालक आहेत.
त्यांनी आपली बजाज कंपनीची काळ्या-पिवळ्या रंगाची रिक्षा विजयनगर बसथांब्याजवळ रस्त्यावर लॉक करून उभी केली होती. मात्र, 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान त्यांची रिक्षा अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या रिक्षाची किंमत दीड लाख रुपये असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
काळेवाडी पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्ष नलावडे या अज्ञात रिक्षा चोरट्याचा शोध घेत आहेत.