पिंपरी-चिंचवड : काळेवाडीत विजयनगर परिसरात बांधकामाच्या ठिकाणाहून 40 हजार रुपये किमतच्या लोखंडी सेंट्रिंग प्लेट चोरल्या गेल्या आहेत. या प्रकरणी काळेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 नोव्हेंबर ते 18 नोव्हेंबरच्या दरम्यान विजयनगरमधील समर्थ कॉलनीत, निर्मल बॅथनी इंग्लिश स्कूलजवळील या बांधकामस्थळी ही चोरी झाली. या ठिकाणाहून ४० हजार रुपये किमतीच्या ३० लोखंडी सेंट्रिंग प्लेट चोरीला गेल्या.
नाझीम हकिम अन्सारी (वय 37, रा. किवळे) यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. अन्सारी हे कंत्राटदार असून त्यांच्या बांधकामस्थळावर ठेवलेल्या लोखंडी प्लेट अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याचे त्यांनी तक्रारीत नमूद केले आहे.
काळेवाडी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. भारतीय न्याय संहितेच्या कलम 303(2) नुसार हा गुन्हा दाखल नोंदविण्यात आला असून सहायक पोलिस निरीक्षक नलावडे या प्रकरणाचा तपास करत आहेत.