पिंपरी-चिंचवड
बुधवारी निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सादर होणार नाटक....'कथा वंगभंगाची'
Jul 13 2026
16
बुधवारी निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सादर होणार नाटक....'कथा वंगभंगाची'
पिंपरी, ता. १३ जुलै २०२६ - सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार व संगीत नाटक अकादमी, दिल्ली यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय नाट्य महोत्सवात शहरातील थिएटर वर्कशॉप कंपनीची निवड झाली आहे. या महोत्सवात १५ जुलै रोजी थिएटर वर्कशॉप कंपनी कथा वंगभंगाची या नाटकाचे सादरीकरण करणार आहे.
महाकवी कालिदास जयंतीनिमित्त व 'वंदे मातरम्' राष्ट्रीय गीतास १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 'कथा वंगभंगाची' या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन प्रभाकर पवार यांनी केले आहे.
बुधवारी (ता. १५) निगडी-प्राधिकरणातील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात सायंकाळी ६ वाजता या नाटकाचे सादरीकरण होणार आहे.
- संगीत नाटक अकादमी दिल्ली, Sangeet Natak Akademi Delhi, पिंपरी चिंचवड, Pimpri Chinchwad, निगडी प्राधिकरण, Nigdi Pradhikaran, ग. दि. माडगूळकर नाट्यगृह, G D Madgulkar Natyagruha
- राष्ट्रीय नाट्य महोत्सव, National Theatre Festival, सांस्कृतिक मंत्रालय भारत सरकार, Ministry of Culture Government of India
- कथा वंगभंगाची, Katha Vangbhangachi, नाटक, Marathi Play, थिएटर वर्कशॉप कंपनी, Theatre Workshop Company