news
clock
शेतीच्या पाण्यासाठी झालेल्या वादातून दांपत्याला शिवीगाळ व  मारहाण

शेतीच्या पाण्यासाठी झालेल्या वादातून दांपत्याला शिवीगाळ व मारहाण

शेतीच्या पाण्यासाठी झालेल्या वादातून दांपत्याला शिवीगाळ व  मारहाण

पिंपरी, ता. २४ - खेड तालुक्यातील काळुस-पवळेवाडी येथे शेतीसाठी विहिरीचे पाणी भरत असताना एका पती-पत्नीला आरोपींनी शिवीगाळ करुन  मारहाण केली आहे. ही घटना २२ फेब्रुवारीला घडली आहे.

याबाबत, संबंधित महिलेने उत्तर चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिलेने आरोपींना सांगितले की रविवार असल्यामुळे आज पाणी भरण्याची आमची पाळी आहे. या कारणावरून आरोपी सार्थक तानाजी पवळे याने फिर्यादी महिलेचे पती हिम्मतराव पवळे यांना काठीने छातीवर मारहाण केली. सार्थकसोबत असलेल्या महिलेने फिर्यादीस शिवीगाळ केली.  भांडणे सोडवण्यासाठी फिर्यादी पुढे गेली असता, आरोपीने फिर्यादी महिलेल्या डाव्या हाताच्या मनगटावर दगडाने मारहाण करुन जखमी केले आणि कानावर हाताने थापड मारली.  हिम्मतराव पवळे “तुझी विकेट टाकीन” अशी धमकी दिली. 

आरोपींना अद्याप अटक केली नाही. आरोपींविरोधात २३ फेब्रुवारीला उत्तर चाकण पोलिस ठाण्यात गुन्हा  कलम ११८(१), ११५(२), ३५१(२), ३५२, ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories