news
clock

फेब्रुवारीचा हफ्ता न मिळाल्याने लाडक्या बहिणी नाराज

हफ्ता कधी मिळणार याबाबत शासनाने नेमकी माहिती देण्याची मागणी

पुणे, ता. १० - फेब्रुवारी महिना संपून मार्च महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला आहे तरीही लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हफ्ता मिळाला नाही त्यामुळे लाखो भगिनी नाराज आहेत. थकीत हफ्ता कधी मिळणार याचीच प्रतीक्षा त्यांना लागून राहिलेली आहे. लाडकी बहिण योजनेमध्ये मिळणारा १५०० रुपयांचा हफ्ता अनेक भगिनींच्या कुटुंबांसाठी महत्त्वाचा आहे. त्यामुळे शासनाने याबाबत लवकरात लवकर नेमकी माहिती देऊन भगिनींची काळजी दूर करावी, अशी अपेक्षा लाभार्थी भगिनींनी व्यक्त केली आहे.

सामान्यतः महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांतच लाभार्थी भगिनींच्या खात्यात रक्कम जमा केली जाते. त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांत फेब्रुवारीचा हप्ता येऊ शकतो अशी महिलांना अपेक्षा  आहे. फेब्रुवारी आणि मार्च या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे जमा होतील अशीही शक्यता महिलांना वाटते. यापूर्वी अशा प्रकारे दोन हप्ते एकदम देण्यात आले आहेत. 

परंतु, शासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही, त्यामुळे महिलांमध्ये अस्वस्थता आहे. आपला हफ्ता कधी जमा होईल याकडे सर्व लाभार्थी भगिनींचे लक्ष लागले आहे. 

लाडकी बहिण योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. केवळ ज्या महिलांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे. त्यांनाच हप्ता मिळणार आहे. केवायसीसाठी दिलेली मुदत संपली असली तरी ज्यांच्या केवायसीमध्ये काही त्रुटी किंवा चुका आहेत, त्यांना त्या दुरुस्त करण्याची शेवटची संधी देण्यात आली आहे. अशा महिलांनी तातडीने दुरुस्ती करून घेणे गरजेचे आहे.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories