news
clock
लोणावळ्यात आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची मागणी

लोणावळ्यात आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची मागणी

लोणावळ्यात आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची मागणी

पिंपरी, ता. १२ - लोणावळा शहरात आधार कार्ड केंद्र बंद असल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेवक जाकीर खलिफा यांनी मुख्याधिकाऱ्यांना पत्र देऊन शहरात पुन्हा आधार कार्ड केंद्र सुरु करण्याची मागणी केली आहे.

नगरसेवक खलिफा यांनी पत्रात सांगितले आहे की, लोणावळा शहरातील आधार कार्ड केंद्र गेल्या वर्षभरापासून बंद असल्यामुळे नागरिकांना आधार कार्ड काढण्यासाठी किंवा त्यामध्ये दुरुस्ती करण्यासाठी शहराबाहेर जावे लागत आहे. यामुळे विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, शालेय विद्यार्थी तसेच नवजात बालकांच्या पालकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. 

अनेक शासकीय योजनांसाठी आधार कार्ड आवश्यक असल्याने नागरिकांची धावपळ वाढली आहे. नागरिकांना खोपोली, मळवली किंवा इतर ठिकाणी जावे लागत आहे. त्यामुळे वेळ आणि पैशांचा अतिरिक्त खर्चही नागरिकांना सहन करावा लागत आहे. या सर्व बाबींचा विचार करून नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेता आवश्यक कार्यवाही करुन लोणावळा नगरपरिषद हद्दीत आधार कार्ड केंद्र सुरू करण्यात यावे, अशी विनंती नगरसेवक खलिफा यांनी केली आहे.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories