स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाच्या आयोजनासाठी शासनाच्या सूचना

स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाच्या आयोजनासाठी शासनाच्या सूचना

स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण समारंभाच्या आयोजनासाठी शासनाच्या सूचना

पिंपरी, ता. १३ ऑगस्ट २०२६ - देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन शनिवारी, १५ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर उत्साहात साजरा करण्यात येणार असून जिल्हा मुख्यालयात संबंधित पालकमंत्री व मंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येणार आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक जारी केले आहे. राज्याचा मुख्य शासकीय समारंभ मंत्रालय, मुंबई येथे सकाळी ९.०५ वाजता होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येईल. तर पुणे येथे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम होणार आहे.

जिल्ह्याच्या/विभागाच्या मुख्यालयातील ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी ९.०५ वाजता आयोजित करण्यात यावा. सदर दिवशी सकाळी ८.३५ ते ९.३५ वा. या वेळेत इतर कोणताही शासकीय किंवा निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. जर एखाद्या कार्यालयाला अथवा संस्थेला आपला स्वतःचा ध्वजारोहण समारंभ करावयाचा असल्यास त्यांनी तो सकाळी ८.३५ च्या पूर्वी किंवा ९.३५ च्या नंतर आयोजित करावा, असे निर्देश या परिपत्रकाद्वारे देण्यात आले आहेत.



Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories