पुणे शहर / जिल्हा
माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
माळशेज घाटमार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद - जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी
नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन
पिंपरी, ता. २७ जुलै २०२६ - कल्याण-माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ मौजे करंजाळे गावाच्या ठिकाणी रस्ता खचल्यामुळे माळशेजघाट मार्गे अहिल्यानगर तसेच पुणे येथून मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पुर्णपणे बंद करण्यात आली आहे.
वाहतूक नियमन व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये याकरिता वाहतूक बंद करण्यात आली आहे. आळेफाटा-नारायणगाव-खेड-चाकण-तळेगाव (एमआयडीसी)-लोणावळा खोपोली-मुंबई या पर्यायी मार्गाने वळविण्यात आली असल्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र डुडी यांनी आदेश जारी केले आहे.
- Ahilyanagar Mumbai Route, Alternative Route, District Collector Jitendra Dudi
- National Highway 61, Road Damage, Road Collapse, Pune Mumbai Traffic Route
- Malshej Ghat Traffic Closed, Malshej Ghat Road, Kalyan Malshej Ghat National Highway
- आळेफाटा नारायणगाव खेड चाकण तळेगाव लोणावळा खोपोली मार्ग
- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, वाहतूक नियमन, कायदा व सुव्यवस्था
- रस्ता खचला, करंजाळे गाव
- कल्याण माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१
- माळशेज घाट वाहतूक बंद, माळशेज घाट मार्ग