news
clock
देशभरातील बॅंका २८ फेब्रुवारीपासून सलग ५ दिवस बंद राहणार

देशभरातील बॅंका २८ फेब्रुवारीपासून सलग ५ दिवस बंद राहणार

देशभरातील बॅंका २८ फेब्रुवारीपासून सलग ५ दिवस बंद राहणार

पुणे, ता. २८ -  भारतभरातील बँका २८ फेब्रुवारीपासून पुढे, सलग ५ दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांनुसार, सर्व बॅंका दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बंद असतात२८ फेब्रुवारीला चौथा शनिवार असल्याने देशभरातील बँका बंद राहतील. त्यानंतर, रविवारी (ता. १) साप्ताहिक सुट्टी असल्याने देशभरातील बँका बंद राहणार आहेत. सुट्ट्यांच्या कालावधीत बॅंकांच्या डिजीटल सुविधा सुरु राहतील.

विविध राज्यांतील बॅंकाच्या सुट्ट्यांची माहिती - 

- २ मार्च (होळी पूजन) -  लखनऊ आणि कानपूर मुख्य ऑफिस असणाऱ्या बँकांच्या शाखा बंद  राहतील.

- ३ मार्च (धूलिवंदन आणि डोल यात्रा)  -  महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तराखंड, आसाम, तेलंगाना, राजस्थान,        पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, गोवा, बिहार, झारखंड, केरळ आणि आंध्र प्रदेशातील बॅंका बंद राहतील. 

- ४ मार्च (होळीचा दुसरा दिवस) - होळीच्या दुसऱ्या दिवशी त्रिपुरा, गुजरात, मिझोराम, ओडिशा, चंदीगड,      उत्तराखंड, मणिपूर, अरुणाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, उत्तर प्रदेश, दिल्ली, बिहार, छत्तीसगड,   मेघालय आणि हिमाचल प्रदेश या राज्यांमध्ये बँका बंद असतील.

Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories