news
clock
खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात एकूण ११ लाख ६५ हजारांचे मॅफेड्रोन जप्त

खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात एकूण ११ लाख ६५ हजारांचे मॅफेड्रोन जप्त

 खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात एकूण ११ लाख ६५ हजारांचे मॅफेड्रोन जप्त 

पिंपरी, ता. २४ - पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खालुंब्रे गावात एकूण ११ लाख ६५ हजार ४०० रुपयांचा मॅफेड्रोन हा अंमली पदार्थ दोन युवकांकडून दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी जप्त केला आगहे.  २२ एप्रिल २०२६ रोजी रात्री ९ वाजता ही कारवाई करण्यात आली. तीन आरोपींना अटक केली आहे, दोन आरोपी फरार आहेत.

 पोलिसांनी आरोपी  शिशुपाल धनाराम चौधरी (२५), रामदिन भवरलाल चौधरी (२४) आणि प्रविण मल्लाराम चौधरी (२२) यांना अटक केली. आरोपींनी एकत्र येऊन ११६ ग्रॅम एम.डी. अंमली पदार्थ बेकायदेशीरपणे विक्रीसाठी वाहतुक करत होते. आरोपींच्या ताब्यातून मॅफेड्रोनसह १ मोटार सायकल, ०३ मोबाईल, १ इलेक्ट्रानिक वजनकाटा, प्लॉस्टिक पाऊच व स्टिल चमच्यासह १३ लाख ८६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहेत.

आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार, एम.डी. हा अंमली पदार्थ आरोपी प्रविण मल्लाराम चौधरी यांच्याकडून विक्रीसाठी आणला होता. पोलिसांनी फरार आरोपी  मांगीलाल चौधरी आणि  नरेश चौधरी यांचा शोध घेत आहेत.


Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Top Categories