किरकोळ वादातून युवकावर धारधार हत्याराने जीवघेणा हल्ला

किरकोळ वादातून युवकावर धारधार हत्याराने जीवघेणा हल्ला

किरकोळ वादातून युवकावर धारधार हत्याराने जीवघेणा हल्ला

पिंपरी, ता. २५ - किरकोळ वादाच्या कारणावरुन एका युवकाला लाथाबुक्क्यांनी मारहाण व धारधार हत्याराने जीवघेणा हल्ला केल्याची घटना एम. एम. शाळा चौक-काळेवाडी येथे शनिवारी (ता. २३) घडली आहे. चार आरोपींना पोलिसांनी अटक केली असून रविवारी (ता. २४) त्यांच्यावर काळेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  सचिन संपत शिंदे (वय २५ वर्षे, ड्रायव्हर, रा. आनंदनगर, चिंचवड) यांनी तक्रार दिली आहे. आरोपी अजित राजु चौगुले (वय २५ वर्षे, रा. चिंचवड), अनिकेत राजेंद्र तुपे (वय १९ वर्षे, रा. थेरगाव), सचिन बाबासाहेब चौधरी (वय २६ वर्षे, रा. जगतापनगर, थेरगाव) व वसिम बाबर खान (वय २८ वर्षे, रा. जगतापनगर, थेरगाव) यांना पोलिसांनी अटक केली आहे. चारही आरोपींनी फिर्यादीचा मेहुणा विशाल गणपत भोसले (वय २५ वर्षे) यास किरकोळ वादाचे कारणावरुन हाताने व लाथा बुक्क्यांनी मारहाण करुन धारदार हत्याराने पाठीवर तीन ठिकाणी मारुन गंभीर जखमी करुन जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे

आरोपींवर काळेवाडी पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ (१), ११५ (२), ३ (५) आर्म अॅक्ट ४,२५,२७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 





Leave a Reply

Cancel Reply

Your email address will not be published.

Recent News

Top Categories